• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विष्णुपुरीतील ‘काम बंद आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
विष्णुपुरीतील ‘काम बंद आंदोलनात’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा; दीपक गजभारे यांचे आवाहन
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या निषेधार्थ १६ जुलै रोजी आंदोलन

नायगाव | प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड (दक्षिण) महानगर यांच्या वतीने बुधवार, दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता एस.जी.जी.एस. महाविद्यालयासमोर, विष्णुपुरी (ता. जि. नांदेड) येथे ‘काम बंद आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित घटनेची उच्चस्तरीय व स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पुलावरील व महामार्गावरील सुरू असलेली कामे तात्काळ स्थगित करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये विष्णुपुरी पुल दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी, संबंधित कंत्राटदार कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, पुलाच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक करणे तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे यांचा समावेश आहे.

या आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अक्षय (भाऊ) बनसोडे, जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, युवा आघाडी जिल्हा महासचिव ॲड. वैभव लष्करे, महानगराध्यक्ष गोपालसिंह टाक, महानगर महासचिव शुद्धोधन कापसीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनतेच्या हक्काच्या या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड (दक्षिण) चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माधवराव गजभारे (घुंगराळा) यांनी केले आहे.

यावेळी दीपक गजभारे म्हणाले, “जनतेच्या जीविताच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. सार्वजनिक कामांतील निष्काळजीपणा व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे.”

Ad 1
Previous Post

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात स्कॉलरशिप अभ्यासवर्गाचा शुभारंभ

Next Post

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव काळगे यांना निवेदन; संसदेत प्रश्न मांडण्याचे आश्वासन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव काळगे यांना निवेदन; संसदेत प्रश्न मांडण्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In