• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूर तालुक्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी

राज्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या सुधारित योजनेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस तसेच खरीप कांदा या प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार असून, अर्ज स्वतः किंवा बँक अथवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या माध्यमातून भरता येईल.

योजनेसाठी आवश्यक अटी

  • जमिनीची अधिकृत कागदपत्रे व पीक लागवड घोषणापत्र आवश्यक.
  • आधार क्रमांक बँक खात्याशी तसेच आधार-संलग्न पेमेंट प्रणालीशी जोडलेला असावा.
  • किमान ०.१० हेक्टर क्षेत्रावर संबंधित पीक लागवड असणे आवश्यक.
  • विमा अर्जातील पीक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक यामध्ये तफावत आढळल्यास सर्व्हेमधील नोंद अंतिम मानली जाईल.
  • चुकीची माहिती देऊन किंवा गैरमार्गाने अर्ज केल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी सांगितले की, योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे विविध कृषी योजनांपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अचूक माहिती देऊन नियोजित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृषी विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे, असेही आवाहन केले आहे.

Ad 1
Tags: Vijay Bhavar
Previous Post

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

Next Post

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In