
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | करकंब (ता. पंढरपूर) | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची व व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कदम यांनी महर्षी दयानंद सरस्वती लिखित ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ भेट देऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख (मालक), उपसरपंच विवेक (नाना) शिंगटे, संजय धोत्रे, ज्येष्ठ शिक्षक अतुल अभंगराव, गणेश सूर्यवंशी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत संबंधित अधिकारी व शाळा प्रशासनाच्या तयारीचे कौतुक केले.
