• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकअधिकार आंदोलन संघटनेचे उपोषण तात्पुरते मागे; 23 जुलै रोजी प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

भटक्या-विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी लोकअधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. या विषयावर 23 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

सन 2024 मध्ये शासनाच्या विशेष मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पद्वारे भटक्या-विमुक्त व आदिवासी समाजातील नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी सुमारे 500 अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही अनेक अर्ज प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा तसेच विविध शासकीय योजना व सवलतींचा लाभ घेण्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे संघटनेने सांगितले.

लोकअधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, तालुका अध्यक्षा उमाताई जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार, तसेच लता उत्तम शिंदे, पल्लवी शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राजश्री लष्करे, सारिका गोंडे, अशोक मोरे, गणेश तांबवे, राजू शिंदे आदी उपोषणात सहभागी झाले होते.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन डोंगरे यांनी श्रीगोंदा-पारनेर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या हस्ते आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रात 23 जुलै रोजी विशेष बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले असून, तोपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या हस्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले.

उपोषण सांगता प्रसंगी संतोष शेठ नागवडे, राहुल छत्तीसे, आप्पा सोनवणे, नवनाथ शिंदे, अनिल चौरे, प्रवीण सुडगे, संतोष भोसले, जिवा घोडके यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट

मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक मध्यस्थी करत उपोषण मागे घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Ad 1
Previous Post

राज्यात पावसाची अनियमितता कायम; हवामान खात्याचा इशारा, शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

Next Post

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत; रिसोडकरांची मागणी

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
18
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
9
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
50
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत; रिसोडकरांची मागणी

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In