ऐतिहासीक सातारा नगरीत साजरा होणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*मुंबई दि. 02 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा यंदा 67 वा वर्धापन दिन असून हा वर्धापन सोहळा उद्या 3 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी ३ वाजता ऐतिहासीक सातारा नगरीत तोफखाना येथील तालीम संघ मैदानात मोठया उत्साहात साजरा होणार आहे. या वर्धापन दिन सोहळयाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साता-याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि स्वागताध्यक्ष पदी रिपाइंचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड राहणार आहेत. या सोहळयाचे निमंत्रक रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे असुन रिपाइंचे माजी मंत्री अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम , पप्पू कागदे, अण्णा वायदंडे, चंद्रकांता सोनकांबळे, भूपेश थुलकर, विजय अगलावे, मोहन भोयर, सुरेश बार्शिंग, सिद्धार्थ कासारे, रमेश मकासरे, प्रकाश लोंढे, प्रकाश मोरे, मिलिंद शेळके, बाळाराम गायकवाड दयाळ बहादुर,यासह राज्यभरातील सर्व प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते या सोहळयास उपस्थित राहणार आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोंबर 1957 रोजी करण्यात आली. त्या प्रित्यर्थ दरवर्षी 3 ऑक्टोंबरला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी नित्यनियमाने साजरा केल्या जातो. यंदा रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन ऐतिहासीक सातारा नगरीत साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासीक सातारा नगरीत रिपब्लिकन पक्षाचा 67 वर्धापन दिन यंदा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयाच्या प्रारंभी सता-यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळयाला अभिवादन करुन तसेच येथील भिमाई स्मारकाला अभिवादन करुन रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळयास प्रारंभ करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील वारस असणारे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणुन निमंत्रीत करण्यात आले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साता-यातील प्रतापसिंह विद्यालयात इयता पहिलीत प्रवेश घेवून शिक्षण घेतले होते. त्या ऐतिहासीक आठवणींना सातारा शहराने जपुन ठेवले आहे. त्यामुळे ऐतिहासीक सातारा नगरीत रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळयास राज्यभरातील हजारो रिपब्लिकन कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन वर्धापन दिन सोहळयास सर्व जातीधर्मीय जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
Discussion about this post