• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिवृष्टीचा परिणाम; ‘एसआयआर’ प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नवी दिल्ली | प्रतिनिधी

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या मतदारयादींच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने १० दिवसांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रीय पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

RelatedPosts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

राज्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत आतापर्यंत ७६.७२ टक्के मतदारांपर्यंत प्रगणना अर्ज पोहोचविण्यात आले असून, त्यापैकी ३५ टक्के अर्ज भरून मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वात कमी ८.३८ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ८.४१ टक्के मतदारांनी अर्ज भरले आहेत. याउलट यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६७.५ टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्यात ६५.९८ टक्के मतदारांनी अर्ज सादर केले आहेत.

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घरोघरी भेटी देऊन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ जुलै होती, तर अंतिम मतदारयादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली होती.

राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविल्यानंतर आयोगाने १० दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे.

दरम्यान, पुनर्विकास आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या मतदारांना त्यांच्या मूळ ठिकाणीच मतदार म्हणून पात्र ठरविण्याचा प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.

Previous Post

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

देशातील ६० कोटी मतदारांची ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण; स्थलांतरित मतदारांच्या नोंदणीबाबत आयोगाचा विचार

Related Posts

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.
Blog

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
3
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.
Blog

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
3
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;
Blog

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026
3
“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण
Blog

“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

September 1, 2026
1
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

28
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन
Blog

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन

September 1, 2026
7
Next Post

देशातील ६० कोटी मतदारांची 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण; स्थलांतरित मतदारांच्या नोंदणीबाबत आयोगाचा विचार

ताज्या बातम्या

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In