• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कारुंडे पालखी तळ माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधांची तयारी पूर्ण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सोलापूर | प्रतिनिधी

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील पालखी तळ परिसरातील विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असून ग्रामपंचायत व प्रशासनाने माऊलींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पालखी तळ पूर्णपणे सज्ज झाला आहे.

शनिवार (१८ जुलै) रोजी बरड येथे मुक्काम केल्यानंतर रविवार (१९ जुलै) रोजी पालखी बरड–राजुरी–धरमपुरी–कारुंडे मार्गे नातेपुते मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी नव्याने पालखी तळ उभारण्यात आले असून कारुंडे येथील तळाचेही सुशोभीकरण करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळाचे मुरमीकरण करण्यात आले असून भाविकांच्या निवाऱ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. वारकऱ्यांसाठी स्नानासाठी शॉवर, नळांची व्यवस्था, फिरती शौचालये, मोबाईल चार्जिंग पॉइंट, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच मंदिराची रंगरंगोटी करून परिसर आकर्षक बनविण्यात आला आहे. मंदिरावर ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा – कारुंडे तळ’ असा फलकही लावण्यात आला आहे.

याशिवाय स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, कचराकुंड्या, हिरकणी कक्ष, विश्रांती मंडप, उपचार सेवा केंद्र, पाणी टँकर, स्वागत कमानी तसेच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कामांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी व भाविक कारुंडे येथे दाखल होणार असल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. माऊलींच्या आगमनाची ग्रामस्थांसह नातेपुते पोलीस, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि प्रशासनातील अधिकारी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Tags: Kiran Shelar
Previous Post

माऊंट कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात; सानिया पंधरे व साई राखडे यांची प्रतिनिधीपदी निवड

Next Post

सरकारी रेशनच्या 41 क्विंटल 63 किलो तांदळासह आयशर वाहन जप्त; धाड पोलिसांची कारवाई

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
45
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
25
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
81
Next Post

सरकारी रेशनच्या 41 क्विंटल 63 किलो तांदळासह आयशर वाहन जप्त; धाड पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In