• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिलवडीतील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

भिलवडी | प्रतिनिधी

भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या उच्च माध्यमिक विभागात इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा कृतीशील सहभाग वाढावा या उद्देशाने कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने नियोजन करण्यात आले.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

यावेळी इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या भेटवस्तू नवागत विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे स्वागत केले. पेनपासून हस्तकलेच्या विविध वस्तूंपर्यंत अनेक भेटवस्तू देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि सुप्त कलागुणांचे दर्शन घडले. आकर्षक स्टेज सजावट, फनी गेम्स, फिशपाँड तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रम विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. या उपक्रमांचा सर्व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव के. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. शालेय शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन पाळले तर सीसीटीव्हीची गरज भासणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. मोरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता भारतीय संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात प्रा. एम. एस. पुजारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. एस. व्ही. कुकडे यांनी शालेय जीवनातील आवश्यक नियम व सूचनांची माहिती दिली, तर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. जी. एस. साळुंखे यांनी विभागाच्या स्थापनेपासूनचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. ए. ए. शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती विभाग प्रमुख सौ. ए. जी. पाटील यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने केले. सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. एम. बी. पाटील यांनी मानले.

Previous Post

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खामगावात 21 ते 28 जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेतील मनरेगा मजुरीचा लाभ वर्षभरापासून प्रलंबित; यवतमाळातील लाभार्थी कुटुंबाची न्यायाची मागणी

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
45
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
25
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
81
Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेतील मनरेगा मजुरीचा लाभ वर्षभरापासून प्रलंबित; यवतमाळातील लाभार्थी कुटुंबाची न्यायाची मागणी

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In