• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाच कंदील चौकाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिरूर नगरपरिषद सभागृहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
पाच कंदील चौकाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिरूर नगरपरिषद सभागृहात
0
SHARES
79
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | शिरूर

शिरूर शहरातील ऐतिहासिक पाच कंदील चौकाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिरूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक सागर नरवडे यांनी ऐनवेळच्या विषयाद्वारे मांडला. या प्रस्तावामुळे शहरात पुन्हा एकदा या विषयावर चर्चा रंगली आहे.

RelatedPosts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजित आंबेकर यांनी यापूर्वी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांच्याकडे निवेदन देऊन पाच कंदील चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची तसेच शिरूरचे सुपुत्र व महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांचा नगरपरिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत नगरसेवक सागर नरवडे यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला.

सध्या पाच कंदील चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून या चौकाला ऐतिहासिक व राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. १९८६ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांची याच ठिकाणी झालेली विराट सभा शिरूरच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्या ऐतिहासिक स्मृतीच्या जतनासाठी चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी मातोश्री प्रतिष्ठानने जानेवारी २०२५ पासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्षा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद, नगरसेवक अभिजित पाचर्णे तसेच भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते नितीन पाचर्णे यांच्याकडेही निवेदने सादर केली होती.

याबाबत बोलताना अभिजित आंबेकर म्हणाले की, पाच कंदील चौकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेमुळे वेगळी ओळख मिळाली असून त्या इतिहासाचा सन्मान म्हणून चौकाला त्यांचे नाव देणे आवश्यक आहे.

प्रस्ताव मांडताना नगरसेवक सागर नरवडे यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला असून शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

याच प्रस्तावामध्ये महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांच्या कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर शहरात त्याबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू झाली असून, नगरपरिषद यावर काय निर्णय घेते याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

शिंदे विद्यालयाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून १० लाखांचा निधी; दोन वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ

Next Post

नाशिकमध्ये आधाराश्रमातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पोलिसांची शोधमोहीम सुरू

Related Posts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Blog

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026
13
Blog

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
7
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.
Blog

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026
17
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
Blog

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

September 2, 2026
20
Blog

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

September 2, 2026
6
शेतकऱ्यांच्या महामार्ग आंदोलनाला राजकीय बळ; भाई दिगंबर कांबळे यांच्या जन आक्रोश आंदोलनाला खासदार विशाल दादा पाटील ,माजी मंत्री विश्वजित कदम साहेब व शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्यासह जाहीर पाठिंबा

18
Next Post

नाशिकमध्ये आधाराश्रमातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पोलिसांची शोधमोहीम सुरू

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In