• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिल्लीतील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २३ जुलैला महाराष्ट्र बंदचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | लोणार | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला लोणार तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड व तालुका सचिव संदीप हिवाळे यांनी केले आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी कथित लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या आवाहनानुसार राज्यभर महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असून, लोणार तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी पक्ष, जात आणि धर्माचे भेद बाजूला ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा बंद विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तसेच लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. बंद शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, लोणार तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बंदबाबत जनजागृती करत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली भूमिका नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

Next Post

मारेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

मारेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In