• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंचळगावात डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त जनजागृती; विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

भडगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिरोध महिना’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कृष्णराव पाटील माध्यमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना डेंग्यू आजाराची माहिती व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

डॉ. विवेक खतगावकर (सहाय्यक संचालक, हिवताप, नाशिक), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ही मोहीम राबविण्यात येत आहे. भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ आणि पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेवक राजेंद्र पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार (कळवाडीकर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डेंग्यूवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा. घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ घासून कोरडी करावीत तसेच पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवावे. या उपाययोजनांमुळे डासांची पैदास रोखण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या वतीने आरोग्य पथकाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, उज्ज्वल राठोड, आरोग्य सेवक राजेंद्र पवार, अभिराज चव्हाण, धनराज बोरसे, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम देवरे, भगवान जायभावे, सुदर्शन पाटील यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कृष्णा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

Next Post

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच गोवंशांची पातुर पोलिसांकडून सुटका; ९.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच गोवंशांची पातुर पोलिसांकडून सुटका; ९.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In