• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

तिरंगा, संविधान आणि महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन विद्यार्थ्यांचा संविधानिक मार्गाने एल्गार; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

शिरूर | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘दिल्ली जंतर-मंतर आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला कृती समिती’च्या वतीने गुरुवारी (दि. २३) शिरूर येथे संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मार्केट यार्ड) येथून मोर्चाला प्रारंभ झाला. तहसील कार्यालयापर्यंत संविधानिक मार्गाने शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय तिरंगा, भारतीय संविधानाची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा तसेच विविध मागण्यांचे फलक होते. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय भीम”, “विद्यार्थ्यांचा आवाज – आमचा संघर्ष, अन्यायाविरुद्ध लढा आमचा हक्क” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मोर्चात विविध सामाजिक संघटना, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततापूर्ण आणि संविधानिक पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चाने शिरूर शहराचे लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन

तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तसेच शिरूर पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले.

निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, १९, २१ आणि ३२ चा उल्लेख करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.

या प्रमुख मागण्या

निवेदनात दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याची स्वतंत्र चौकशी, पोलीस अधिकाऱ्यांनी नावाच्या पट्ट्या काढल्याच्या प्रकरणाची चौकशी, विना वर्दीतील व्यक्तींकडून कथित हल्ल्याच्या आरोपांची चौकशी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील टीईटी पेपर लीक प्रकरणाची CBI/SIT किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाला कृती समितीने पाठिंबा जाहीर केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संताप

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी NET व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, शैक्षणिक व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

मान्यवरांचे मार्गदर्शन

मोर्चानंतर झालेल्या सभेत माजी आमदार अशोकबापू पवार, रविंद्र धनक, डॉ. स्वप्निल भालेकर, डॉ. सुनिता पोटे आणि रमेश गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. वैशाली साखरे यांनी मानले.

या शांतता मोर्चाच्या आयोजनासाठी अविनाश शिंदे, विशाल ससाणे, गणेश गोरखे, ॲड. हिमांशू गायकवाड, ॲड. मायाताई गायकवाड, विशाल जोगदंड, मुजफ्फर कुरेशी, ॲड. योगिता पाटील, सुवर्णा वाघमारे, डॉ. स्वप्निल भालेकर, डॉ. अखिलेश राजुरकर, डॉ. विशाल महाजन, डॉ. संतोष पोटे, डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. वैशाली साखरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

मोर्चाची सांगता भारतीय राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार व शिरूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सुपूर्द केले.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

जिद्दीची प्रेरणादायी वाटचाल थांबली; संस्कृती घरत (सोनू) यांचे दुःखद निधन

Next Post

आंचळगावात डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त जनजागृती; विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

आंचळगावात डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त जनजागृती; विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In