• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच गोवंशांची पातुर पोलिसांकडून सुटका; ९.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
117
VIEWS
Ad 1

पातुर | प्रतिनिधी :

पातुर पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत गुरुवारी (दि. २३ जुलै) सकाळी धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या पाच गोवंशांची सुटका केली. या कारवाईत दोन वाहने आणि पाच गोवंश असा एकूण सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास पातुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन मालवाहू वाहनांमधून गोवंश कत्तलीसाठी आणून पातुर नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ परिसरात उतरविण्यात येत आहेत. माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.

कारवाईदरम्यान एमएच-०२-सीई-६७२० क्रमांकाची टाटा एस आणि एमएच-३०-बीडी-७६७० क्रमांकाची बोलेरो पिकअप ही दोन वाहने आढळून आली. बोलेरो पिकअपमध्ये तीन, तर टाटा एसमध्ये दोन गोवंश अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.

या प्रकरणी अब्दुल आलीम अब्दुल करीम कुरेशी (रा. कुरेशी नगर, दहीहांडा), ख्वाजा आसिफ अली ख्वाजा आमिर अली (रा. किल्ला, पातुर) आणि शिवानंद वसंतराव मोकळकर (रा. ढोणे नगर, पातुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शिवानंद मोकळकर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५-अ, ५-ब, ९, तसेच प्राण्यांच्या निर्दयतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पातुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी, बंडू मेश्राम, रोशन पवार, नितीन गजभार आणि साई नवले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना पुढील देखभाल व संरक्षणासाठी गौरक्षण केंद्रात रवाना करण्यात आले.

Previous Post

आंचळगावात डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त जनजागृती; विद्यार्थ्यांना डास प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

Next Post

खडकवासला धरणातून मुठा नदीत ३,८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

खडकवासला धरणातून मुठा नदीत ३,८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In