• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दर्यापूरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीसह मित्रपक्षांचे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

दर्यापूर | प्रतिनिधी :

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व विविध समविचारी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दर्यापूर शहरात उत्स्फूर्त व भक्कम प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. २३ जुलै) शहरातील गांधी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गांधी चौक परिसरात आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला. यावेळी “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न – आता आवाज उठवूया” या प्रमुख घोषवाक्याखाली आंदोलन करण्यात आले. सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

महाराष्ट्र बंदला दर्यापूरमधील अनेक व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनीही पाठिंबा दर्शवत आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवली. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, विविध मित्रपक्षांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags: Dipak Meshram
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम; रक्तदान, वृक्षारोपणातून जनसेवेचा संदेश

Next Post

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नायगाव व नरसीत कडकडीत महाराष्ट्र बंद; सर्वपक्षीय सहभागाने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नायगाव व नरसीत कडकडीत महाराष्ट्र बंद; सर्वपक्षीय सहभागाने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In