• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नायगाव व नरसीत कडकडीत महाराष्ट्र बंद; सर्वपक्षीय सहभागाने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

नायगाव | प्रतिनिधी :

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नायगाव आणि नरसी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बंदच्या पार्श्वभूमीवर नायगाव व नरसी येथील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने, आस्थापने आणि बाजारपेठा बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, नायगावचा आठवडी बाजार असतानाही व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याशी ऐक्य व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रमुख बाजारपेठा दिवसभर कडकडीत बंद राहिल्या.

यावेळी नायगावच्या हेडगेवार चौकात वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध नोंदवला आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भवितव्याच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

बंद आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी नायगाव येथे पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, तर नरसी येथे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनीही शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार भगवानराव हणमंते (अंचोलीकर), युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे (घुंगराळेकर), जिल्हा सचिव बालाजी गायकवाड, जिल्हा सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, सतीश वाघमारे, मिलिंद बच्छाव, अविनाश गायकवाड, साईनाथ जिगळेकर, युवा उद्योजक कपिल डुमणे, राजू भद्रे, फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, समाजवादी पक्षाचे रणजीत देशमुख, जरांगे पाटील आंदोलन समन्वयक बाळाजी वाघमारे, बबलू नरसीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिक, पत्रकार आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भवितव्याच्या संरक्षणासाठी भविष्यातही अशीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags: Dipak Gajbhare
Previous Post

दर्यापूरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीसह मित्रपक्षांचे आंदोलन

Next Post

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत निषेध मोर्चा; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत निषेध मोर्चा; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत निषेध मोर्चा; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In