• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खुशबू मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; दीड वर्षांच्या संघर्षाला यश, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

पेण | प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी अखेर पेण पोलिस ठाण्यात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायतराज संघटना यांनी गेल्या दीड वर्षांपासून सुरू ठेवलेल्या न्यायलढ्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

माहितीनुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी उपचारादरम्यान खुशबूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय, सामाजिक संघटना आणि आदिवासी समाजाने विविध आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला होता. मात्र, दीर्घकाळ गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

अखेर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्यानंतर ३० जुलैपासून पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी ही न्यायाच्या लढ्याची केवळ सुरुवात असल्याचे सांगत, या प्रकरणातील इतर संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवरही निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच, या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करून तपास जलदगतीने पूर्ण करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील सर्व दोषींना शिक्षा मिळेपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

चिंचणी (वांगी) येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था; १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची साई ट्रस्ट JNPT शाळेच्या PTA उपाध्यक्षपदी निवड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची साई ट्रस्ट JNPT शाळेच्या PTA उपाध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In