• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषद कार्यालयातील अनधिकृत वावरावर आक्षेप; कार्यालयीन शिस्तीसाठी नियमावली लागू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी :

शिरूर नगरपरिषद कार्यालयामध्ये नगरसेवकांचे कार्यकर्ते, हितचिंतक, काही नगरसेविकांचे पती, ठेकेदार, एजंट तसेच इतर अनधिकृत व्यक्तींचा वाढता मुक्त वावर थांबवून कार्यालयीन शिस्त राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्यात यावी, अशी मागणी मातोश्री कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित मुकुंदराव आंबेकर यांनी मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिरूर नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत नागरिकांना पारदर्शक व दर्जेदार सेवा मिळाव्यात या उद्देशाने उभारण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात काही अनधिकृत व्यक्ती विविध विभागांमध्ये विनाअडथळा वावरत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.

यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव निर्माण होण्याची शक्यता वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांमध्ये विलंब होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. काही व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नगरपरिषदेच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या

  • केवळ कामानिमित्त आलेल्या नागरिकांनाच संबंधित विभागात प्रवेश द्यावा.
  • नगरसेवकांचे कार्यकर्ते, हितचिंतक, नगरसेविकांचे पती, ठेकेदार, एजंट व इतर अनधिकृत व्यक्तींना विभागीय कार्यालयात विनाकारण प्रवेश नाकारावा.
  • प्रत्येक विभागात व्हिजिटर रजिस्टर किंवा व्हिजिटर पास प्रणाली सुरू करावी.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अनधिकृत हस्तक्षेप होणार नाही, याबाबत स्पष्ट प्रशासकीय सूचना जारी कराव्यात.
  • सर्व विभागांच्या प्रवेशद्वारावर “अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही” असे फलक लावावेत.
  • कार्यालय परिसरात सीसीटीव्हीद्वारे नियमित देखरेख ठेवावी.
  • कार्यालयीन शिस्त भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी.
  • नागरिकांची कामे पारदर्शक, वेळेत व कोणत्याही दबावाशिवाय होतील यासाठी प्रभावी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करावी.

अभिजित आंबेकर यांनी सांगितले की, शासकीय कार्यालये ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असून त्याठिकाणी कोणत्याही अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप होऊ नये. नगरपरिषदेची प्रतिमा अधिक सक्षम, लोकाभिमुख व विश्वासार्ह राहावी तसेच नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

Next Post

मालुंजा बु. – जिकठाण फाटा रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप; ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा

Related Posts

Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
8
Blog

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026
2
Blog

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026
11
Blog

पावसाचा जोर वाढला; वाशी तालुक्यात मुसळधार सरींमुळे नदी-नाले तुडुंब

August 2, 2026
5
Blog

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

August 2, 2026
13
Blog

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

August 2, 2026
5
Next Post

मालुंजा बु. – जिकठाण फाटा रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप; ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा

ताज्या बातम्या

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In