• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मालुंजा बु. – जिकठाण फाटा रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप; ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
145
VIEWS
Ad 1

गंगापूर | प्रतिनिधी

मालुंजा बु. ते जिकठाण फाटा या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गंगापूर, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम मंडळ) तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली असून अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली आहे. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला मंजुरी अथवा प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच देण्यात आलेल्या निवेदनात ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गंगापूर कार्यालयाला ताळे ठोकून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत बोलताना कणकोरी गावातील आमदार प्रशांत बंम यांचे युवा कार्यकर्ते अर्जुन पवार यांनी सांगितले की, “रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या संयमाचा अंत झाला असून ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ताळे ठोकून आंदोलन करण्यात येईल.”

सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला असून पावसाळ्यात प्रवास अधिक धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आता या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

शिरूर नगरपरिषद कार्यालयातील अनधिकृत वावरावर आक्षेप; कार्यालयीन शिस्तीसाठी नियमावली लागू करण्याची मागणी

Next Post

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी; ४९ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी; ४९ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In