• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी; ४९ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरासाठी ४९ कोटी रुपयांच्या नव्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, बांधकाम समितीचे सभापती अक्षय आलासे, नगरसेवक जय कडाळे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

यापूर्वी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने केवळ १५ टक्केच पूर्ण केले होते. त्यामुळे ही योजना तब्बल १२ वर्षांपासून रखडली होती. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीदरम्यान आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासनाने नव्या योजनेला मंजुरी दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ही नवीन योजना सन २०४८ पर्यंतच्या अपेक्षित लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आली असून, पुढील २५ ते ३० वर्षे शहराला मुबलक, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने, निवेदने आणि शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांची दखल घेत अखेर योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले…

“कुरुंदवाडच्या पाणीप्रश्नासाठी अनेक वर्षांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शासनाने नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नवीन यंत्रणेमार्फत काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण झाल्याचा आनंद आहे.”

Previous Post

मालुंजा बु. – जिकठाण फाटा रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप; ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा

Next Post

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन' दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In