• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

धुळे | प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ निमित्त विशेष पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी व पशुपालकांना देशी गोवंश संवर्धन, आधुनिक पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. राहुल देसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. गिरीश पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले. प्रमुख पाहुणे बाबासाहेब बेलदार यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित करत देशी गोवंशाचे जतन, संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. बबनराव इल्हे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत शास्त्रशुद्ध पशुधन व्यवस्थापन, मुरघास निर्मिती आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगाचा अवलंब करून व्यवसाय अधिक फायदेशीर बनवावा, असे सांगितले.

तांत्रिक सत्रात डॉ. राहुल देसले यांनी दुग्ध प्रक्रिया उद्योगातील संधी, डॉ. धनराज चौधरी यांनी देशी गोवंश संवर्धन, मुरघास उत्पादन तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी, तर डॉ. गिरीश पाटील यांनी पशुपालकांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय श्री. जयेश पाटील यांनी देशी पशुपालनातील आपला यशस्वी अनुभव उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. धनराज चौधरी आणि डॉ. अतिश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, लुपिन, टीएनएस तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षण कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी; ४९ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

Next Post

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In