• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या दिव्यांग कल्याण योजनांची सविस्तर माहिती समजून घेऊन त्यांचा लाभ तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी दिल्ली येथे संबंधित केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. भाषेच्या अडचणीमुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने स्थानिक अधिकारी व कार्यकर्त्यांनाही दिल्लीत येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

श्रीगोंदा येथील पंतनगर कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित दिव्यांग बांधवांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जातील.

यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग बांधवांच्या मानधनाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. त्याची तात्काळ दखल घेत खासदार लंके यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमादरम्यान सुमारे ३०० ते ३५० दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्यांना आवश्यक सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणाही खासदार लंके यांनी केली.

याशिवाय, श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच सोडवण्यासाठी लवकरच भव्य ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

पावसाचा जोर वाढला; वाशी तालुक्यात मुसळधार सरींमुळे नदी-नाले तुडुंब

Next Post

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In