वाशी ता. प्रतिनिधी.वाशी येथुन जवळच असलेल्या मौजे पिंपळगाव कळमेश्वरी येथील अनिरुद्ध संतोष जोगदंड याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फै घेतली जाणारी उच्च प्राथमिक परीक्षा पुणे (UPS)इयत्ता सातवी2026 वाशी तालुक्यातून 300पैकी 250गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला असून त्याच्यावर वाशी तालुका व पिंपळगाव परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.याचे औचित्य साधून कळमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भैरट सर व शिक्षक वृंद यानी अनिरुद्ध याचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.









