• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गावंडगाव विटंबना प्रकरण: सर्व आरोपींवर कडक कारवाई करा; सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण समितीची अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर प्रतिनिधी

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

पातूर :
गावंडगाव येथे घडलेल्या गंभीर विटंबना प्रकरणातील सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पावले उचलावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
८ ऑगस्ट २०२६ रोजी गावंडगाव येथे घडलेल्या या विटंबना प्रकरणामुळे संपूर्ण बंजारा समाजात तसेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात चान्नी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मुख्य आरोपी अद्याप फरार?
घटनेनंतर गावकऱ्यांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, चान्नी पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचा आरोप समितीने केला आहे. दोन दिवसांनी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दोन आरोपींना गुन्हे अन्वेषण पथकाद्वारे अटक करण्यात आली. परंतु, मुख्य कथित आरोपी लता गजानन नागोलकर आणि बाली राजेश नागोलकर या दोन्ही महिला आरोपी अद्यापही बाहेर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या महिला आरोपी शेजारील मळसूर येथे राहत असून, त्यांच्या मुक्त संचारामुळे गावात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानायकांच्या प्रतिमेची विटंबना
या घटनेमध्ये बंजारा समाजाचे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे समाजाच्या भावना कमालीच्या दुखावल्या गेल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणात चान्नी पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पूर्व इतिहास तपासण्याची मागणी
आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात यावी. तसेच त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हे नोंद झाले आहेत का, याची चौकशी करून त्या गुन्ह्यांचीही नोंद तपासात घ्यावी, असे समितीने म्हटले आहे. याशिवाय, विजय ताले नावाच्या व्यक्तीने या विटंबनेस जाणूनबुजून प्रोत्साहन दिल्याचा आरोप असून, त्यांचीही सखोल चौकशी करून वैभव गजानन नागोलकर व विजय ताले यांच्याबाबत न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यात यावी.

१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्ताची मागणी

गावंडगाव येथे महाविद्यालय व आश्रमशाळा असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरी व विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आरोपी बाहेर राहिल्यास या कार्यक्रमांच्या वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी समितीने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदिनाची आवक नोंद घेतली आहे.

Previous Post

राहुल जामकर यांची पांढरकवडा येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती.

Next Post

पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
25
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.

पांगरा शिव येथील रस्त्याची तहसीलदार व महसूल विभागाकडून पाहणी.

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In