• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

नाशिक — प्रतिनिधी : अमर पठारे दि. 7 ऑगस्ट 2026

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती येथे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘जगात भारी – द फोन रूम’चे सर्वेसर्वा शुभम पंढरीनाथ पवार यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या निमित्ताने केक, पुष्पहार, बुके अथवा महागड्या भेटवस्तू आणण्याऐवजी गरजूंच्या उपयोगी पडतील अशा वस्तू आणण्याचे आवाहन शुभम पवार यांनी आपल्या चाहत्यांना केले होते.

“माझ्यासाठी केक आणू नका, पुष्पहार किंवा बुके आणू नका. वाढदिवसानिमित्त काही भेट द्यायचीच असेल तर गरजू विद्यार्थ्यांसाठी पेन, पेन्सिल, पुस्तके, पाण्याची बॉटल, रेनकोट किंवा त्यांच्या उपयोगाची एखादी वस्तू घेऊन या,” असे आवाहन त्यांनी केले होते.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत सामाजिक उपक्रमासाठी हातभार लावला. त्यामुळे वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा ठरला.

शून्यातून उभे केले स्वतःचे विश्व

शुभम पवार यांचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. व्यवसायाची सुरुवात करून ‘जगात भारी – द फोन रूम’ या नावाला ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ग्राहकांच्या बजेटचा विचार करून त्यांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार मोबाईल उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने त्यांना ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मदतीसाठी सदैव तत्पर

व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही शुभम पवार सक्रिय आहेत. गरजू व्यक्तीला मदतीची गरज भासल्यास शक्य त्या पद्धतीने मदतीसाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. रात्री-अपरात्री मदतीसाठी फोन आला तरी ते तत्काळ धावून जातात, अशी त्यांची ओळख नाशिककरांमध्ये निर्माण झाली आहे. आज त्यांची लोकप्रियता नाशिकपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रभर पसरली आहे.

रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

वाढदिवस म्हटले की केक, हार, बुके आणि भेटवस्तू असे चित्र सामान्यतः पाहायला मिळते. मात्र शुभम पवार यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत रक्तदान शिबिर आयोजित केले आणि गरजूंसाठी उपयोगी वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहन करून समाजापुढे एक सकारात्मक आदर्श निर्माण केला.

रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गरजूंसाठी मदतीचा पुढाकार यामुळे शुभम पवार यांचा यंदाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.

Previous Post

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

Next Post

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
7
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
19
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

तीन बर्डी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाईचा खात्मा

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In