• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

सोनगाव | वार्ताहर

सोनगाव व परिसरातील वाडी-वस्तीवर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

सकाळच्या वेळेस शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि नागरिकांना नदीवरील पुलाजवळ, अनापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच परिसरातील विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता हीच कुत्री मळहद्दीकडे येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ले करू लागल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.

मागील आठवड्यात येवलकर वस्ती येथील दोन शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात घुसून हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बकऱ्या गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नुकतीच पेरणी केलेल्या मका आणि सोयाबीनच्या शेतातही मोकाट कुत्री घुसून पिकांचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी आहेत.

आधीच रानडुक्कर आणि रानटी सशांमुळे पिकांचे नुकसान होत असताना आता मोकाट कुत्र्यांच्या समस्येची भर पडल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.

मोकाट कुत्री इतर नगरपालिका किंवा नगरपंचायत हद्दीतून आणून सोडली जात असल्याचा संशय असल्यास संबंधित प्रशासनाशी तातडीने पत्रव्यवहार करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी पुढे न आल्याची नाराजीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शेतकऱ्यांच्या पशुधनाचा प्रश्न निर्माण झालेला असताना ग्रामपंचायतीने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून गावातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच आता नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

“आम्हाला आमचा हक्क हवा आहे, आम्हाला सुरक्षितता हवी आहे. बाधित शेतकऱ्यांना न्याय आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळाली पाहिजे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Ad 1
Previous Post

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

Next Post

लोहा येथे राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसऱ्या दिवशीही जल्लोष

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

लोहा येथे राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसऱ्या दिवशीही जल्लोष

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In