• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहा येथे राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; दुसऱ्या दिवशीही जल्लोष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

लोहा | प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील सुनेगाव तलाव येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ला दुसऱ्या दिवशीही खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लोहा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी लातूर, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला. खेळाडूंच्या उत्साहाला पालकांनीही मोठा प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. विविध जिल्ह्यांमधून आलेल्या संघांच्या सहभागामुळे सुनेगाव तलाव परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

रविवार असल्याने लोहा शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ड्रॅगन बोट स्पर्धेतील रोमांचक सामने पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील विविध भागांतून खेळाडू सहभागी होत असल्याने या स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष टॉम जोसेफ आणि सचिव दिनेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. भैरवनाथ नाईकवाडी उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून लोहा-कंधार तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाला प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिता ताई देवरे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

सुनेगाव तलावाच्या परिसरात सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे लोहा तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

Ad 1
Tags: Devanand Raibole
Previous Post

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

Next Post

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In