• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; प्रवासी सेवेला मिळणार नवी गती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामीण भागातील बसफेऱ्या वाढणार; दोंडाईचा बसस्थानकासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

दोंडाईचा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोंडाईचा आगाराला प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या नवीन बसेसचे लोकार्पण शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दोंडाईचा बसस्थानकात लोकनेते तथा उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या पाच नवीन बसेस दोंडाईचा आगाराला मिळाल्या आहेत.

दोंडाईचा शहरासह शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एस.टी. बससेवा ही अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. आगारातील जुन्या बसेसची संख्या वाढल्याने बससेवेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यामुळे नवीन बसेसची मागणी सातत्याने करण्यात येत होती. आता पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जुन्या बसेसमुळे बससेवेवर ताण

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन यांनी दोंडाईचा आगाराच्या सद्यस्थितीची माहिती दिली. दोंडाईचा आगाराकडे पूर्वी एकूण ६० बसेस होत्या. मात्र, १५ वर्षांचा वापर पूर्ण झालेल्या जुन्या बसेस वाहन नोंदणी विभागाच्या नियमानुसार अवसायनात गेल्याने सध्या प्रत्यक्षात केवळ ४३ बसेस उपलब्ध आहेत. दरवर्षी किमान १० बसेस वापरातून बाहेर पडत असल्याने ग्रामीण मार्गांवर बससेवेचा तुटवडा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून दोंडाईचा आगारासाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर करून घेण्यात आल्याचे प्रविण महाजन यांनी सांगितले. नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, विविध मार्गांवरील बसफेऱ्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

‘शिवाई’ बसेससाठी चार्जिंग स्टेशनची मागणी

दोंडाईचा आगारात लवकरच विजेवर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावे, तसेच दोंडाईचाहून लांब पल्ल्याच्या शिवाई बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही प्रविण महाजन यांनी केली.

तसेच आगारात वाहकांची मोठी कमतरता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मंजूर आवश्यकतेनुसार ११५ वाहकांची गरज असताना सध्या केवळ ६० वाहक उपलब्ध असल्याने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

दोंडाईचा बसस्थानकासाठी ८ कोटींचा निधी

यावेळी सरकारसाहेब रावल यांनी सांगितले की, दोंडाईचा येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी मंत्री मा. ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

एस.टी. ही महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती असून, ग्रामीण तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी वाहतूक सेवा मिळणे आवश्यक आहे. दोंडाईचा आगाराची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

बसफेऱ्या वाढण्यास मिळणार मदत

पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे दोंडाईचा आगारातून विविध मार्गांवरील बसफेऱ्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील बससेवा वाढविण्यासही यामुळे मदत होणार आहे. नवीन बसेसमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेच्या दृष्टीने अधिक नियोजनबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या प्रारंभी दोंडाईचा आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन, भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा पूजा खडसे, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, उपाध्यक्ष मनोज धनगर, सभापती मुकेश देवरे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, राकेश अग्रवाल, भरतरी ठाकूर, अक्षय चव्हाण, रविंद्र जाधव, संजय रामोळे, रत्नलाल कोठारी, तसेच महिला प्रदेश सरचिटणीस चंद्रकला सिसोदिया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, एस.टी. कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोंडाईचा आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मिळाल्याने ‘नवीन बस, नवी सुविधा आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा’ या दिशेने दोंडाईचा एस.टी. आगाराने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या निर्णयाचे दोंडाईचा शहरासह शिंदखेडा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

Next Post

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In