सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर आपल्या कार्यशैलीतून आवाज उठविणारे ॲड. शैलेश निकम आणि ॲड. राजेश निकम यांनी रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, लॉन्ग मार्चचे प्रणेते तथा माजी खासदार, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
सातारा येथील रेस्ट हाऊस येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, सातारा युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे, सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ॲड. शैलेश निकम आणि ॲड. राजेश निकम यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
