भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.गुरुवार दिनांक ३ आक्टोंबर २०२४ रोजी कांदिवली पश्चिम येथील मां दुर्गा भवानी मित्र मंडळाच्या देवी चे आगमन मोठ्या उत्साहात, जल्लोषात झाले आहे.सन २०१३ पासून मां दुर्गा भवानी मित्र मंडळाच्या सार्वजनिक नवरात्रौत्सव दरवर्षी सार्वजनिक सेवा समिती चाळ,के.डी.कंपाऊंड, गांधी नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात दिनांक ३ आक्टोंबर २०२४ या दिवशी होऊन महानवमी शनिवार दिनांक १२ आक्टोंबर २०२४ रोजी दसरा या दिवशी संपन्न होते.
मां दुर्गा भवानी मित्र मंडळाच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवात रात्री या विभागातील पुरुष, महिला,मुले ,मुली देवी च्या गाण्यावर गरबा दांडिया नृत्यात तल्लीन होऊन जातात.या वेळी देवी आगमन होऊन घटस्थापना केली जाते. देवी च्या मूर्ती ची घटांची पूजा केली जाते.मां दुर्गा भवानी मित्र मंडळाच्या सार्वजनिक देवी चे दर्शन दिवस रात्र येथील रहिवासी, देवी भक्त घेतात.
या विभागातील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव, भारत कवितके, प्रेम शंकर सागर वर्मा, दशरथ गरगडे, गोपाळ घाग, विजेंद्र यादव, अशोक यादव, रुपचंद गुप्ता चाचा, श्रीकांत प्रजापती, प्रेम भाई, यांनी आज घटस्थापना दिवशी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.


Discussion about this post