भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द व्हावे,व धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी साठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी धनगर समाजातील मल्हार यौध्दे पंढरपूर येथील 16 दिवस उपोषण कर्ते गणेश केसकर व योगेश धरम यांनी संभाजी नगर येथील उपोषण स्थगित केले आहे.गेले सहा दिवस ते उपोषणाला होते.खिलारे कुटुंब हे धनगर असून त्यांच्या कडे धनगड जात वैधता प्रमाणपत्र आढळल्याने न्यायालयात धनगर समाजाला न्याय मिळाला नाही.हा अधिकार संसदेला असल्याचे न्यायालयाने सांगितले.
खिलारे कुटुंबातील सहा जणांचे धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालया बाहेर गेले सहा दिवस झाले गणेश केसकर व योगेश धरम हे समाज बांधव उपोषणाला बसले होते.पण तेथील कार्यालयातून फक्त वेळ सांगून वेळ मारली जात होती.
या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातून धनगर समाजाच्या महिला व पुरुष यांची गर्दी वाढत होती.सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सागर खिलारे यांची जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याचे कार्यालयाने लिखित स्वरूपात दिले,व बाकीचे 5 जणांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करुन लवकरच देऊ, असे सांगितले.
ते आम्ही 9 आक्टोंबर पर्यंत देऊ असे लिहून दिले.पण गणेश केसकर यांनी त्यांना 8 आक्टोंबर पर्यंत मुदत देऊन आम्ही तूर्त हे उपोषण स्थगित करीत असलो तरी 8 आक्टोंबर पासून आम्ही पुन्हा उपोषण ला बसू .
या साठी सर्व जमलेल्या धनगर समाज बांधवांनी 8 आक्टोंबर ला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.असे आवाहन केले.या वेळी जालना संभाजी नगर रोड वर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.
Discussion about this post