सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी येथे भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व त्यांच्या परंपरा विद्यार्थी दशेत त्यांच्या मनावर खोल रुजून ते वृद्धिंगत होण्याच्या हेतूने रेशमी धाग्यांचा प्रेमाचा रंग म्हणजे रक्षाबंधन उत्साहात संपन्न झाला. राखीचा धागा नुसताच सूताचा दोरा नसून, ते एक शील ,स्नेह , पवित्रतेचे रक्षण करणारे, सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवणारे, रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो.
हाच रक्षाबंधनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावरती कोरला जावा .याच उदात्त्य हेतूने विद्यालयात हा उत्सव साजरा केला गेला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . दळवी सर श्री. सरमळकर सर यांनी रक्षाबंधन याचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक विद्यालयातील सर्व महिला भगिनी व विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली .यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनीनी विद्यार्थ्यांना राखी बांधून एकात्मतेचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. गायकवाड मॅडम , सौ. भाताडे मॅडम ,भोसले मॅडम सौ. तेटांबे मॅडम यांनी केले.






