• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह कार जप्त, पाच जणांविरोधात गुन्हा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
सावदा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह कार जप्त, पाच जणांविरोधात गुन्हा
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

विभागीय प्रतिनिधी
सावदा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, विमल पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सावदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप होंडा अमेझ कारमधून वाहून नेली जाणार होती. त्यानुसार सावदा पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१२ वाजण्याच्या सुमारास कार थांबवून तिची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान कारमध्ये प्रतिबंधित गुटखा, विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आली. कारमध्ये उपस्थित असलेल्या चालकासह संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ५ लाख २७ हजार ७०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय, प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची होंडा अमेझ कार देखील जप्त करण्यात आली. त्यामुळे या कारवाईतील एकूण मुद्देमालाची किंमत १० लाख २७ हजार ७०० रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

या प्रकरणात कारचालकासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्राथमिक चौकशीत हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हा माल भुसावळ आणि वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

दरम्यान, या प्रतिबंधित मालाच्या पुरवठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच माल कोणाकडून आणण्यात आला आणि कोणत्या व्यापारी किंवा व्यक्तींना त्याचे वितरण केले जाणार होते, याचा कसून तपास सावदा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितेश बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय तडवी यांच्या पथकाने सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

Ad 1
Previous Post

कजगाव वीज उपकेंद्रात चोरी; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार; यावल तालुक्यात खळबळ

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार; यावल तालुक्यात खळबळ

बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार; यावल तालुक्यात खळबळ

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In