• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; पाथरीसाठी आणखी नवीन बसेस देण्याचे आश्वासन

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

पाथरी, प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी

पाथरी शहराच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेत महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ ०५ बसचे उद्घाटन शिवसेनेचे परभणी-हिंगोली विधान परिषद आमदार सईद खान यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाथरी येथील सेलू कॉर्नर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आमदार सईद खान यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल विशेष कौतुक केले. तसेच पाथरी परिसरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी आगामी काळात आणखी नवीन १० बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

आमदार सईद खान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाथरी परिसरातील नागरिकांच्या वाहतूक सुविधांना बळ मिळत असून, ‘राजमाता जिजाऊ’ बसच्या उद्घाटनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक सुविधांसह शहराच्या विकासासाठी आमदार सईद खान सातत्याने प्रयत्नशील असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मुंजाजी भाले , उपनगर अध्यक्ष आलोक चौधरी,जिल्हा सरचिटणीस उद्धवराव नाईक साहेब, विधानसभा प्रमुख बालू भाऊ कुराडे, मार्केट कमिटी संचालक अशोक जिजा गिराम, नगरसेवक गोविंद बापू हरकळ, नसीर तात्या, वैजनाथ जिजा कोल्हे, नाना टाकळकर, माजी सभापती सदाशिव थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती कृष्णा भैया शिंदे, विक्रम गायकवाड, विठ्ठल रासवे युसुफुद्दीन अन्सारी, एल. आर. कदम , उपशहर प्रमुख शकील अन्सारी, अजीम तांबोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सुनंदाताई फलके, रेखा मनेरे, किरण शिंदे, डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच पाथरी आगार प्रमुख बालासाहेब झरीकर यांच्यासह आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘राजमाता जिजाऊ’ बसच्या उद्घाटनासह पाथरीच्या विकासासाठी सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांबद्दल आमदार सईद खान यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आणखी नवीन 10 बसेस देण्याचे दिलेले आश्वासन पाथरीकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Ad 1
Previous Post

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

Next Post

कार्यशाळेतून विद्यार्थिनींना निर्भयतेचे मार्गदर्शनकन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम .

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
28
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
39
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
कार्यशाळेतून विद्यार्थिनींना निर्भयतेचे मार्गदर्शनकन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम .

कार्यशाळेतून विद्यार्थिनींना निर्भयतेचे मार्गदर्शनकन्या विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम .

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In