दुरुस्ती ची मागणी
लहान मोठ्या अपघाताचे रोजच वाटसरू रोजच बळी
रस्त्यावर चालताना विदर्थ्यांना द्यावी लागते सत्व परीक्षा
प्रतिनिधी फुलसावंगी –
येथील किनवट मार्गांवरील रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे.
या रस्त्यावर लहान मोठे अपघात होणे ही जणू रोजचीच बाब झाली आहे. आता यात पावसाचे पाणी साचून हे अधिकच घातक ठरू लागल्याने नागरिकांतून हा खड्डेमय रस्ता तातळीने दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.
फुलसावंगी येथून किनवट कडे जाणाऱ्या रोड हा
अत्यंत वर्दळ असलेला रस्ता आहे. या मार्गांवर सुधाकरराव नाईक सायन्स कॉलेज, शिवरामजी माघे कनिष्ठ महाविद्यालय व रस्त्याच्या कडेलाच जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आहे. जवळपास सर्वच या मार्गांवर शैक्षणिक संस्था असल्याने या रस्त्याने विध्यार्थी व पालकांची वर्दळ असते.शिवाय फुलसावंगी शी निघडीत असलेले निगनुर, टाकली, अमडापूर, नारळी, इसापूर असे सर्व सात किमी अंतरावरील खेडिंचा हा फुलसावंगी प्रवेशाचा मुख्य रस्ता असल्याने परिसरातील सर्व रहिवासी ये-जा करीत असतात. त्यामुळे या मार्गावर दुचाकी, चारचाकी यासह बसेसची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. बांधकाम विभागाच्या च्या दुर्लक्षामुळे या मार्गावर हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तरी खड्डेमय झालेला रस्ता पाण्याखाली जातो.खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रोज चं लहान मोठ्या अपघाताची मालिका सुरु आहे.ह्या पावसाळ्याच्या हंगामात तर पूर्णपणे रस्ता हा नादुरुस्त झाला आहे.आता लवकरच शाळा, कॉलेज यांचे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होतं आहे त्या पूर्वी या मार्गा वरील झालेले खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.







