प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-मानव हा समाज प्रिय असल्यामुळे समूहाने राहत होते,समूहात राहणे मानवाला आवडत होते, सुख -दुःखात एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासली जात होती.जे काम समूहाने करावे लागत असा वेळी एकमेकांना मदत घेत असत.त्यामुळे माणुस नेहमी माणसाच्या सानिध्यात राहत असत. त्यांच्याशी गप्पागोष्टी कराव्यात. बोलावं, मात्र सध्या हे सर्व दुर्मिळ होत जात आहे. माणूस मोबाईल मध्येएवढा गुरफटून गेला आहे की, समोर बसलेल्या व्यक्तीला समोरा – समोर बोलत नाही.सुख दुःख शेअर करत नाहीत ही शोकांतिका आहे. मोबाईलचा वापर कमी करावा. जसे आपण एक दिवस उपवास करतो, त्याप्रमाणे एक दिवस पूर्णपणे मोबाईल हाताळणे बंद करावे. ही सवय जर शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुखकारक ठरेल. असे मत ज्येष्ठ साहित्यिक रवीप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पी.व्ही. देशपांडे लिखित कवी मुक्तेश्वरावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले.
या समारंभच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठांनच्या अध्यक्षा सौ. अंजलीताई कुलकर्णी होत्या. यांनी प्रतिष्ठानची सखोल माहिती दिली.
दरम्यान साहित्यिक कुलकर्णी पुढे म्हणाले,की, कादंबरी पेक्षा आत्मकथन हा लेखन प्रकार रूढ होत आहे. तो चांगला आहे. त्यामध्ये सत्य असते. सत्याची बाजू असते, परंतु हा साहित्यप्रकार दुर्लक्षित झाला आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले खऱ्या लेखनाची तुलना ए आय(AI) शी होऊ शकणार नाही.
व्यासपीठावर सौ. कुलकर्णी, श्रीमती प्रभा कुलकर्णी, सौ सीमा जमदग्नी, डॉ. कुलकर्णी, चेअरमन प्रा.शरद पराडकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी करून दिली.
आभार सुनिल मुळे यांनी मानले.







