वंधली: साई विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यालयात स्वयंशासन पद्धती (Self-Governance) राबवून विद्यार्थ्यांनीच संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळला. याच दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर गोपाल मो. पायघन यांचा जन्मदिवसही मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला असून, या सुप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षकांची भूमिका दरवर्षी प्रमाणे या वर्षीही शिक्षक दिनाचे मुख्य आकर्षण ‘स्वयंशासन दिन’ हे होते. शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका घेतल्या.त्यात कु. सानिया ठाकरे,अपुर्वा पाल, लक्ष्मी ठाकरे,दिपाली तुरारे, गायत्री देहारकर,प्रथमेश निंबाळकर, आदित्य पेंदोर या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका घेउन पूर्वतयारी करून वेगवेगळ्या वर्गांवर जाऊन तास घेतले आणि लहान विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देत अध्यापन केले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि शिक्षकांबद्दल आदरभाव वाढीस लागण्यास मदत झाली.
वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रयोगशाळा परिचर गोपाल मो. पायघन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करत, गोपाल पायघन यांच्या वतीने शाळेतील सर्व मुला-मुलींना पेनचे वाटप करण्यात आले.
या उपयुक्त शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.मान्यवरांचे मार्गदर्शन व सांगता
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रविण मा.बरबटकार होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला, विद्यार्थ्यांच्या स्वयंशासनाचे कौतुक केले आणि गोपाल पायघन यांच्या अनोख्या उपक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक,पाटील सर, वाटेवार सर, बरडे मॅडम कर्मचारी खापणे, विधाते, वासाडे कालर व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वर्ग चालवून हा दिवस यशस्वी केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.






