• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवतीर्थाच्या रखडलेल्या कामावरून २८ सप्टेंबरला कुरुंदवाड बंदची हाक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 6, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रशासनाला अंतिम इशारा; “आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे”

प्रतिनिधी : कुरुंदवाड : कुरुंदवाड शहराच्या प्रवेशद्वाराजवळील जुने शिवस्मारक पाडून त्या ठिकाणी भव्य शिवतीर्थ उभारण्याचे काम शासन व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिवतीर्थाचे काम रखडल्याने कुरुंदवाडकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवतीर्थासह शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

कुरुंदवाड नगरीच्या विशेष विकास आराखड्यातील विविध कामे तसेच अनेक नागरी सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. अर्धवट राहिलेली जुनी कामे पूर्ण करण्याऐवजी नवीन कामांना प्राधान्य दिले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी नेमकी कोणती कार्यवाही करीत आहेत, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील विविध प्रश्नांबाबत नागरिकांनी वारंवार निवेदने देऊन तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. “एका प्रश्नासाठी किती निवेदने द्यायची आणि किती वर्षे पाठपुरावा करायचा?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शिवतीर्थ हा केवळ विकासकामाचा विषय नसून कुरुंदवाडच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि जनभावनेचा प्रश्न असल्याचे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती व विविध संघटनांनी म्हटले आहे. “शिवतीर्थ झालेच पाहिजे,” या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी २४ तास कुरुंदवाड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शिवतीर्थाच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समिती व विविध संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

“निवेदने खूप झाली, पाठपुरावा खूप झाला आणि आश्वासनेही खूप झाली. आता कुरुंदवाडकरांना आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. शिवतीर्थ झालेच पाहिजे आणि कुरुंदवाडचा स्वाभिमान जपलाच पाहिजे,” अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या स्वागत कमानीच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नसल्याने हे काम नेमके कधी सुरू होणार, असा प्रश्नही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि कुरुंदवाडकरांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

निमगाव दुडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

Next Post

करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी; ६ लाख ३० हजारांचे २८ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

Related Posts

Blog

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026
1
Blog

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026
0
Blog

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026
3
Blog

गटाराचे सांडपाणी रस्त्यावर; पाइपलाइन रोडवरील नागरिक त्रस्त

September 6, 2026
4
Blog

परतूर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या २८ गोवंशांची सुटका

September 6, 2026
1
Blog

पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन

September 6, 2026
1
Next Post

करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी; ६ लाख ३० हजारांचे २८ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

ताज्या बातम्या

शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी, तंत्रज्ञानाचीही जोड

September 6, 2026

कापूस उत्पादनवाढीचा मंत्र अन् गुणवंतांचा गौरव; धारासूरमध्ये प्रेरणादायी सोहळा

September 6, 2026

पोळा आला दारी, पण महागाईने कंबर मोडली भारी!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In