प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड :-येथील भगतसिंग तरुण मंडळ भैरववाडी -कुरुंदवाड यांनी प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी चे आयोजन केले होते.दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या संघानी चित्त थरारक अशी मानवी मनोरे (पिरॅमिड) करत कुरुंदवाड व परिसरातील दहीहंडी प्रेक्षकांची मने जिंकली. संयोजकांनी 2वेळा चिट्टी काढून संघाना समान संधी न्याय देत 40 फूट उंचीवर दहीहंडी लावण्यात आली होती. दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. महिलांना हा सोहळा बसून पाहण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती.
दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात शिरोळ येथील एस. पी.बॉईज गोडीविहीर तरुण मंडळाने दुसऱ्या प्रयत्नात डब्बल कडा 7स्तर लावत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांकाचे 55,555/-रुचे बक्षीसाचे मानकरी ठरले.
या दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळ येथील 2 संघ आले होते पैकी जय महाराष्ट्र मंडळ व एस पी.बॉईज शिरोळ असे संघ उपस्थित होते.
विजयी संघास रामचंद्र डांगे तात्या व मंगेश चव्हाण, प्रशांत शहापुरे, मनिषा डांगे, यांच्या हस्ते रुपये – 55,555/-चा डिजिटल चेक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास रामचंद्र डांगे( तात्या)मां. नगराध्यक्ष, मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते,मंगेश चव्हाण, प्रशांत शहापुरे (आलास जिल्हा परिषद सदस्य), कुरुंदवाड नगरपरिषदेच्या महिला लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. मनिषा डांगे, उपनगराध्यक्ष दिपक गायकवाड, अक्षय आलासे, रमेश भुजूगडे,उदय डांगे,सौ. संगीता कर्नाळे, शुभम जोंग, ऋषभ डांगे,इ. नगरसेवक /नगरसेविका, तसेच कुरुंदवाड -भैरववाडी मधील असंख्य नागरिक उपस्थित होते.









