• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

उदगीर / प्रतिनिधी
राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षण देण्याची मोठी घोषणा केली; मात्र या घोषणेचा प्रत्यक्ष लाभमिळवण्यासाठी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना अतनूर, जळकोट व उदगीरच्या विविध महाविद्यालयाच्या दारात हेलपाटे मारावे लागत असल्याने ‘मोफत शिक्षण नेमके कुठे आहे?’ असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबतीत राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, उच्च व तंत्रज्ञान वैद्यकीय तंत्रज्ञान मंत्री, मुख्य सचिव, उच्च व तंत्रज्ञान सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, उच्च व तंत्रज्ञान अधिकारी यांना लेखी व ई-मेल द्वारे लेखी तक्रार करून मोफत शिक्षणाचा मांडलेला बाजार व खेळखडोबा संदर्भात चौकशी करण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रल्हाद तिवारी, जिल्हा संघटक बी.जी.शिंदे, उदगीर तालुकाध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, जळकोट तालुकाध्यक्ष संगमेश्वर डोंगरे तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र दलित तरुण संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीधर गायकवाड, अखिल भारतीय दलित शैक्षणिक संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र शिंदे यांनी केली आहे.

RelatedPosts

नरळद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप

मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयीन प्रवेशाचा काळ सुरू असताना शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी, शुल्काबाबतचे नियम आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया यामध्ये स्पष्टता नसल्याने पालकांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे शासन मोफत शिक्षणाची घोषणा करते आणि दुसरीकडे प्रवेशासाठी शुल्काचा प्रश्न निर्माण होतो, तर नेमके पालकांनी करायचे तरी काय ? असा सवाल संतप्त पालक करत आहेत.
शासन म्हणते ‘मोफत’, पालक म्हणतात ‘शुल्क भरा’चा तगादा !

लातूर जिल्ह्यातील अतनूर परिसरातील व उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या प्रवेशाच्या वेळी शुल्काबाबत पालकांकडून तक्रारी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. या प्रश्नावरून पालक आणि महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांच्यामध्ये वारंवार चर्चा व तक्रारी होत असल्याने वातावरण तापल्याचे चित्र आहे. मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी करून त्यांना उच्च शिक्षणाची संधी देण्याचा शासनाचा उद्देश असेल, तर त्याची अंमलबजावणी कागदावर न राहता महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
‘फी’च्या नावाखाली पालकांची लूट होतेय का ?
शासनाच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेनंतरही विद्यार्थिनींच्या पालकांना विविध शुल्कांसाठी पैसे मोजावे लागत असतील, तर ही नेमकी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे की पालकांच्या खिशावरचा अतिरिक्त भार? असा सवाल उपस्थित होत आहे.
पालकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षण विभागाने महाविद्यालयातील शुल्क आकारणीची चौकशी करावी, शासनाच्या मोफत शिक्षण योजनेची स्पष्ट अंमलबजावणी करावी आणि विद्यार्थिनी व पालकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. घोषणा मोठी, पण प्रत्यक्षात प्रवेशासाठी पालकांची फरफट सुरूच असेल, तर ‘मुलींना मोफत शिक्षण’ ही योजना विद्यार्थिनींसाठी आहे की केवळ कागदोपत्री घोषणा ? याचे उत्तर शासन आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाने द्यावे, अशी संतप्त भावना पालकांमध्ये व्यक्त होत आहे.
शालेय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय मंत्र्यांच्या शासकीय परिपत्रक आदेशानुसार मुलींना संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक व पदवीधरांना व पदव्युत्तर शिक्षणासाठी व डिग्री तंत्रज्ञान महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण सक्तीचे केले असून तसा शासकीय परिपत्रक आदेशानुसार जीआर पण संबंधित महाविद्यालयांना, शैक्षणिक संस्थांना पाठविलेले आहेत, असे असतानाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी. स्वतः उदगीर येथे स्वामी विवेकानंद उच्च व तंत्रज्ञान महाविद्यालयांची विद्यार्थ्यांनी असून माझी गेली तीन वर्षे, प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकत असलेल्या उदगीरच्या महाविद्यालयात संस्थाचालक व प्राचार्य च्या सततच्या तगादा लावल्याने मी.भरणा केली आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी कुमारी मयुरी बालासाहेब शिंदे अतनूर यांनी केली आहे.

Previous Post

बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

Next Post

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

Related Posts

नरळद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप
Blog

नरळद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप

September 7, 2026
0
मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी
Blog

मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

September 7, 2026
1
तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Blog

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना

September 7, 2026
0
पोलादपूर मध्ये छत्रपती शिवाजीनगर येथे होणाऱ्या नमो उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा; भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन
Blog

पोलादपूर मध्ये छत्रपती शिवाजीनगर येथे होणाऱ्या नमो उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा; भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन

September 7, 2026
0
Blog

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026
3
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
Next Post
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

ताज्या बातम्या

नरळद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप

नरळद जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप

September 7, 2026
मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा ; वंचित बहुजन आघाडीचा मागणी

September 7, 2026
तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा..पाणी विहरीत दहीहंडी पण निसर्गाची साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In