“तहसील प्रशासनास निवेदन सादर ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत तालुक्यात या वर्षी पावसाने मोठी दांडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे. २६ जून ते जुलै २०२५ दरम्यान अत्यंत तुट पुंजा पाऊस झाला, तर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या सह सर्व खरीप पिके जळून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचा वतीने देण्यात आला आहे. जिल्ह्या सह मानवत तालुकात शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर आणि छोटे व्यापारी यांचे जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शासनाने मानवत तालुका तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि तात्काळ उपाययोजना आखावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड मोर्चा,
धरणे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे. मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ७५,००० रुपये आर्थिक अनुदान द्यावे. तालुक्यातील गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांनाही ७५,००० रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचा प्रलंबित खरीप पीक विमा तात्काळ वाटप करावा, गायरान जमिनीवर विनापरवाना सुरू असलेले सौरऊर्जा प्रकल्प तात्काळ थांबवावेत. जो पर्यंत गायरान धारकांची सहमती नाही, तोपर्यंत कोणताही प्रकल्प उभारू नये. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून प्रत्येक १० किलोमीटरवर गुरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, शेतीवर अवलंबून असलेल्या भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येक कुटुंबास ५०,००० रुपये आर्थिक मदत देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि शालेय फी पूर्णपणे माफ करण्यात यावी,
मानवत नगरपालिकेतील कंत्राटी कामगार गेल्या अनेक दिवसा पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते धम्मपाल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग पंडीत, मानवत तालुका अध्यक्ष दिगंबर घुगे, दत्ताराव राऊत, युवा अध्यक्ष शरद कांबळे, जालींदर वाघमारे, बाबूराव धबडगे, विनोद मकासरे, दत्ताराव तुपसंमुद्रे, महिला सरचिटणीस संजीवनीताई लाटे, श्रीरंग लाटे, महिला अध्यक्ष मंदाकिनी राठोड, महिला उपाध्यक्ष वत्सलाबाई कांबळे, मदन अवचार, युवक सचिव रंजित भैया तुपसमुद्रे, अमोल सूर्यवंशी, अनिरुद्ध कांबळे, भगवान सरोदे, गुंडीबा हरणे, सारीपूत खरात, कल्याण वैराळ, सुभाष कुंभारकर, रतन भाले, रतन लाटे, भीमराव लाटे यांच्या सह पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











