• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

RelatedPosts

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

डफडाच्या तालावर पारंपरिक गीतांचे गायन; माता-भगिनी व मुलींचा उत्स्फूर्त सहभाग

राहुल राठोड
पातूर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील बोडखा तांडा येथे गोर बंजारा समाजाचा पारंपरिक व ऐतिहासिक तिज उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तांड्यातील नायक राजू राठोड, कारभारी बोंदिराम चव्हाण, नारकण कारभारण, माता-भगिनी तसेच मुलींनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

गोर बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृती, रितीरिवाज व इतिहासाशी तिज उत्सवाचे विशेष नाते आहे. सिंधू संस्कृती, मोहेंजोदडो व हडप्पा काळापासून गोर बंजारा समाजाने अन्नधान्याच्या उत्पादनासह व्यापाराची परंपरा जोपासल्याचे समाजातील ज्येष्ठांकडून सांगण्यात येते. याच पारंपरिक वारशाचे प्रतीक म्हणून तिज उत्सवाला समाजात विशेष महत्त्व आहे.

रक्षाबंधनापासून गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीपासून पोळ्यापर्यंत विविध ठिकाणी गोर बंजारा समाजाकडून तिजोत्सव साजरा केला जातो. बोडखा तांड्यातही रितीरिवाजानुसार तिजचे बीजारोपण करण्यात आले. त्यानंतर सलग नऊ दिवस माता-भगिनी व मुली संध्याकाळच्या वेळी तिजेला पाणी घालण्यासाठी जात होत्या. यावेळी डफडाच्या तालावर पारंपरिक गोर बंजारा गीतांचे गायन करण्यात आले.

तिज विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नणगौरी व गणगौर यांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच विसर्जनापूर्वी महापुरुषांचे पूजन करून समाजाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला अभिवादन करण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी तांड्यातील माता-भगिनी, मुली तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिज विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी गणेश राठोड, गोर सिकवाडी तालुका संयोजक यांनी उपस्थित राहून तिजोत्सवाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीबद्दल तांड्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. डफडाच्या तालावर पारंपरिक गोर बंजारा गीतांचे गायन आणि विविध पारंपरिक खेळ रंगले. उत्साहपूर्ण वातावरणात तिज विसर्जन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तांड्यातील नवयुवकांनी केले. तिजोत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, रितीरिवाज, लोककला आणि सामाजिक एकोपा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Previous Post

लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,

Next Post

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

Related Posts

Blog

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026
3
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
Blog

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
1
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
Blog

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
0
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा
Blog

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

September 7, 2026
4
Blog

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

September 7, 2026
3
Next Post

मुलींना मोफत शिक्षण' फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

ताज्या बातम्या

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In