परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नरळद येथे शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ साठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेत नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी तसेच शालेय गणवेशामध्ये एकरूपता आणि शिस्त राहावी, या उद्देशाने हा गणवेश देण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश वितरित करण्यात आला. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रकारे आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांनी गणवेशाचा नियमित व योग्य वापर करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक विलास मोरे, संतोष शिंदे, बालासाहेब पाते, अक्षय राऊत, प्रवीण कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य राम फंड, तंटामुक्त समिती अध्यक्ष रणजित तुपसमुद्रे, जयवंत तुपसमुद्रे, भानुदास तिथे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.











