होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या ‘उन्हाळ्याची सुट्टी, पुस्तकांशी गट्टी’ उपक्रमांतर्गत बक्षीस वितरण उपक्रमात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे केवळ खेळ आणि मनोरंजन नव्हे, तर पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी ठरावी, या उद्देशाने (HARC) यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘उन्हाळ्याची सुट्टी, पुस्तकांशी गट्टी’ उपक्रमांतर्गत उत्कृष्ट वाचन करणाऱ्या २१ बालवाचकांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. आंबेजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रेवाडी येथे हा बक्षीस वितरण व गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा वेळ मोबाईल व दूरचित्रवाणीमध्ये न घालवता पुस्तकांच्या सहवासात घालवावा, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच वाचनातून ज्ञान, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती आणि विचारक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके वाचून वाचनाचा आनंद घेतला.
उपक्रमात सातत्याने वाचन करून उल्लेखनीय सहभाग नोंदविणाऱ्या २१ उत्कृष्ट बालवाचकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना भविष्यातही वाचनाची सवय कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, समन्वयक प्रकाश डुबे, डॉ. शैलेश कदम, ‘आधार माणुसकीचा’चे संस्थापक अध्यक्ष ॲड. संतोष पवार आणि पत्रकार प्रशांत बर्दापूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वर्षभर अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध व्हावीत आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाचनाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आंबेजोगाई तालुक्यातील चार शाळांपैकी
‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीर वाडी शाळेला एच ए आर सी संस्थेतर्फे एकूण 60 अवांतर अतिशय उपयुक्त आणि उच्च दर्जाच्या पुस्तकांची वाचन पेटी उपलब्ध करून देण्यात आली.
२१ उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये दस्तगीर वाडी येथील लक्ष्मी नंदकुमार माने, गीता पद्माकर साळे, प्रांजली परमेश्वर माने, अनुजा पद्माकर साळे, तसेच रिद्धी राहुल माने या विद्यार्थिनींचा ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी पालक नंदकुमार माने, पद्माकर साळे व परमेश्वर माने स्वतः विद्यार्थी घेऊन केंद्रेवाडी येथे आवर्जून उपस्थित झाले.
उन्हाळ्याची सुट्टी, पुस्तकांशी गट्टी’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री औताडे, जयश्री मुंडे, दीपक बिडवे आणि सूर्यकांत घाटे यांचे सहकार्य लाभले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगीरवाडी विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व माहिती व प्रोत्साहन श्रीमती जयश्री औताडे यांनी केले.शाळा व्यवस्थापन समिती यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केल. व शाळेची प्रगती अशीच उत्तरोत्तर व्हावी त्यासाठी शुभेच्छा दिल्या.











