पारनेर (विशेष बातमी):
श्री क्षेत्र देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे श्री अंबिका देवीच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ ते रविवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६:
- सकाळी ९ ते ११ वाजता: भव्य मूर्ती मिरवणूक. यामध्ये लेझीम व झांजपथकाच्या गजरात, ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची), श्री क्षेत्र देवीभोयरे येथील भजनी मंडळे, महिला बचत गट, महिला व ग्रामस्थ सहभागी होतील.
- दुपारी ३ ते ६.४५ वाजता: मूर्ती पूजा विधी. पुरोहित श्री सच्चिदानंद धुंडीराज गाडगीळ गुरुजी व पुरोहित वृंद (अहिल्यानगर) यांच्या हस्ते पूजा संपन्न होईल.
रविवार, १३ सप्टेंबर २०२६: - सकाळी ७.०० वाजल्यापासून: पर्याय होम, पुण्याह वाचन, प्राणप्रतिष्ठा होम व प्रायश्चित्त होम विधी.
- सकाळी ९ ते ११ वाजता: कृष्णकृपांकित डॉ. श्री. विकासानंदजी महाराज मिसाळ (श्री क्षेत्र संतपंढरी पिंपळगाव वाघा, ता. नगर) यांची सुश्राव्य देवी महात्म किर्तनसेवा.
- सकाळी ११.११ वाजता: कृष्णकृपांकित डॉ. श्री. विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या शुभहस्ते नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना.
- सकाळी ११.१५ नंतर: प्रायश्चित्त होम व पुर्णाहुती.
- सकाळी ११.३० नंतर: महाप्रसादाचे वाटप.
या भक्तिमय सोहळ्याचा व महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अंबिका देवी देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ देवीभोयरे, मुंबईकर-पुणेकर मंडळी व सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त आणि गोसावी समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.








