• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक प्रांताध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार हार घालून सत्कार

RelatedPosts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते महेंद्रशेठ यांचे हसणे आणि रुसणे, या संमिश्र भावना आहेत; परंतु महेंद्रशेठ घरत मनाचा सच्चा माणूस आहे आणि हवेहवेसे वाटणारे नेतृत्व आहे. विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसाला महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीने चार चॉंद लागले आहेत. महेंद्रशेठ यांच्यासारख्या आश्वासक चेहऱ्याला योग्य संधी दिली जाईल. ती माझी नैतिक जबाबदारी आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेलघर येथे मंगळवारी (ता. ८) व्यक्त केले. उरण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात काँग्रेसला उभारी मिळाली. जिल्ह्यात वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या शेकापला यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शून्यावर यावे लागले, मात्र काँग्रेसने घवघवीत यश मिळविले. यामागे महेंद्रशेठ घरत यांची रननीती कामाला आली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर महेंद्रशेठ घरत यांची भेट होणे, हा दुग्धशर्करा योग आहे. महेंद्रशेठ जगभर फिरतात आणि आम्हाला ते देश जगाच्या नकाशात शोधावे लागतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. खोटं बोला, पण रेटून बोला, हीच भाजपची मनोवृत्ती आहे. मोदी उठसूठ खोटे बोलत आहेत, जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसची पाळेमुळे तळागाळात अधिक घट्ट रोवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.”
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, ” कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हे माझे कर्तव्य आहे. दुसऱ्याला संधी देण्यासाठी दोन पावले मागे येण्याची विनोद म्हात्रे यांची भूमिका महत्त्वाची आहे.”

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले, महेंद्रशेठ घरत यांच्याकडून आम्हा कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. आमच्या मागे ते नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. समाजाशी बांधिलकी ठेवून तळागाळातील कार्यकर्त्याला साथ देण्यात महेंद्रशेठ घरत यांचा हातखंडा आहे. त्यांचा करिष्मा उरण नगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळाला. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी ‘सुखकर्ता’वर स्वागत केले. तसेच तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक प्रांताध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार हार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

Next Post

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.
Blog

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
4
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
Blog

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026
8
Blog

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026
7
Blog

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

September 9, 2026
7
शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे
Blog

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

September 9, 2026
16
श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

श्री सिद्धेश्वर हायस्कूल, जाखापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 9, 2026
33
Next Post

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

मिशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून सेवानिवृत्ती.

September 9, 2026
वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

September 9, 2026

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In