लोहा, प्रतिनिधी
7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या मिशनमध्ये योगदान बजावलेले भारतीय जवान टिकाराम मोडके यांचा सेवानिवृत्ती निमित्त रॅली आयोजन करून आज सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला.2008 मध्ये औरंगाबाद येथे जाईंन झाली भारतीय सैन्य दल ३ महार रेजिमेंट मध्ये १८ वर्षापूर्वी भरती होऊन टिकाराम मोडके यांनी संपूर्ण कुटुंब सोडून प्रामाणिकपणे भारत देशाची खडतर देशसेवा करून ते ऑगस्ट अखेरीस सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांची सजवलेल्या मोटारीतून लोहा शहरातील जायकवाडी पुनस्थापित ध्वज येथून मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली.यावेळी लोहा नगरपालिकेचे माजी नगरसेवक गटनेते तथा विरोधी पक्षनेते नगरसेवक पंचशिल कांबळे,रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव ढगे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव बुद्धे, संपत्ती भावे, पुंडलिक मोडके, उत्तम मोडके, कोंडीबा मोडके, लक्ष्मण मोडके,भिमराव मोडके , दिंगाबर बुध्दे, गौतम बुध्दे, ग्यानोबा बुध्दे, कुणाल कांबळे,बाबासाहेब बुध्दे,यांनी धम्मत्वजास मानवंदना देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मूळ पेंडु (बु) ता. पालम जि. परभणी येथील रहिवाशी असलेले टिकाराम शिवाजी मोडके हे भारतीय सैन्य दलातील ३ महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. त्यांनी यशस्वी व निष्ठेने देश सेवा बजावून ऑगस्ट अखेर मोडके नियत वयोमानानुसार प्रदीर्घ १८ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने लोहा शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच बसस्थानक परिसरातील भाारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि नगर परिषद प्रांगणातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी टिकाराम मोडके यांचे तिरुपती हॉटेलचे मालक परशुराम कदम पाटील यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच त्यांचे ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले.










