• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देखभाल रक्कम न भरल्याने पतीला १२ महिन्यांची साधी कैद

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1


प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनिधी पातुर ₹१ लाख ५१ हजार ५०० रुपयांच्या थकबाकीप्रकरणी पातूर न्यायालयाचा आदेश; रक्कम भरल्यास तत्काळ सुटकेचे निर्देश

RelatedPosts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पातूर : पत्नीला देय असलेली देखभाल रक्कम न भरता न्यायालयाच्या आदेशाची तसेच तडजोड कराराची पूर्तता न केल्याने पातूर येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी श्री .संदीप मोरे यांच्या न्यायालयाने विशाल समाधान इंगळे यांना दणका दिला आहे. ₹१ लाख ५१ हजार ५०० रुपयांच्या थकीत देखभाल रकमेच्या वसुलीसाठी न्यायालयाने त्यांना १२ महिन्यांची साधी कैद सुनावली असून, थकीत रक्कम भरल्यास तत्काळ मुक्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

फौजदारी विविध अर्ज क्रमांक २८२/२०१६ मधील प्रकरणात प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी संदीप बी. मोरे यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला. या प्रकरणाची पार्श्वभूमी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या मूळ अर्जाशी संबंधित आहे.

न्यायालयाच्या अभिलेखानुसार, मूळ प्रकरणात २६ ऑगस्ट २०१६ रोजी आदेश पारित करून अर्जदार महिलेस अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १ जानेवारी २०१६ पासून दरमहा ₹२ हजार देखभाल रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रतिवादीकडून या आदेशाचे नियमित पालन झाले नसल्याने देखभाल रकमेची थकबाकी निर्माण झाली.

दरम्यान, ७ जानेवारी २०२६ रोजी दोन्ही पक्ष न्यायालयात हजर झाले असता त्यांच्यात तडजोड झाली. दोन्ही पक्षांनी प्रदर्श क्र. ९७ वर समझोता करार दाखल केला. या करारानुसार ₹७ लाखांची रक्कम पूर्ण व अंतिम पोटगी म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यापैकी ₹२ लाख एक महिन्यानंतर, तर उर्वरित ₹५ लाख पुढील पाच महिन्यांत देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

मात्र, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार प्रतिवादीने या समझोता करारातील अटींची पूर्तता केली नाही. तो वारंवार न्यायालयीन कार्यवाहीस अनुपस्थित राहिला तसेच देखभाल रक्कम भरण्यातही अपयशी ठरला. न्यायालयाने आपल्या आदेशात प्रतिवादीने कायद्याच्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, प्रतिवादीला न्यायालयीन कार्यवाहीची माहिती असूनही तो सुमारे आठ महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झाला नव्हता. तसेच त्याने थकीत रक्कम भरण्यासाठी कोणतेही वाजवी कारण मांडले नाही. त्याला पुरेशी संधी देऊनही तो किमान काही रक्कम भरण्यास तयार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमातील कलम ३१ तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५(३) चा आधार घेत प्रतिवादीवर कारवाई केली.

न्यायालयाने ₹१,५१,५०० रुपयांच्या थकीत देखभाल रकमेच्या संदर्भात विशाल समाधान इंगळे यांना १२ महिन्यांची साधी कैद सुनावली आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अनुसूची-II मधील नमुना क्र. १८ नुसार वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष म्हणजे, न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे की, १२ महिन्यांचा कारावास पूर्ण होण्यापूर्वी प्रतिवादीने ₹१,५१,५०० रुपये न्यायालयात किंवा कारागृह प्राधिकरणाकडे जमा केल्यास त्याला तत्काळ मुक्त करण्यात यावे. कारावासाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कारागृह प्राधिकरणाने प्रतिवादीला पुढील आदेशासाठी न्यायालयासमोर हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अर्जदाराकडून ॲड. रूपाली राऊत यांनी बाजू मांडली.

Ad 1
Previous Post

शेकाप पवनचक्की कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरणसंघटित राहिल्याने कामगारांचे प्रश्न सुटतात – भाई विनोद लगारे

Next Post

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

Related Posts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
12
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
9
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
22
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
1
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
30
Next Post
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ

ताज्या बातम्या

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In