दर्यापूर:प्रतिनिधी
दिपक मेश्राम
दर्यापूर एसटी आगारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांचे अतिशय उत्साहात अनावरण पार पडले.
स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दर्यापूर आगारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थितांच्या हस्तकमलाने प्रतिमांचे रीतसर अनावरण करण्यात आले.
महामानवांचा वारसा: आगारात येणाऱ्या लाखो प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना या महामानवांच्या विचारांची व कार्याची सतत प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या प्रतिमांची स्थापना करण्यात आली आहे.
या वेळी उपस्थितांनी दिलेल्या जयघोषाने संपूर्ण आगार परिसर दुमदुमून गेला होता.
दर्यापूर आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून आणि पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.या वेळी उपस्थित मान्यवर
सुनील पाटील गावंडे (दर्यापूर तालुका अध्यक् काँग्रेस कमिटी )व इंजि. नितेश दादा वानखडे (महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक काँग्रेस ), उत्कर्ष भाऊ देशमुख महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक काँग्रेस ), गजाननराव देशमुख जेष्ठ पत्रकार,जीवन वानखडे साहेब (आगार व्यवस्थापक दर्यापूर), अरविंद पोटदुखे साहेब TI दर्यापूर आगार ),विनोद भाऊ पवार (अमरावती जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी), पप्पू पाटील होले (दर्यापूर शहर अध्यक्ष काँग्रेस ), यश भाऊ लवटे,सागर भाऊ देशमुख (दर्यापूर तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस ),दीपक भाऊ बगाडे, पंकज भाऊ राणे, अनिकेत भाऊ खाडे तसेच देवानंद रामचंद्र धंदर (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना दर्यापूर),रावसाहेब भाऊ धांडे,ज्ञानेश्वर आपोतीकर ,दिनेश गवई ‘सुनील तायडे, रोशन वानखडे,राजाभाऊ बडगे, राजेश ओइम्बे,
,उमेश आठवले, धीरज वर्धे,राजेश कोल्हे,जगदीश कांबे
इत्यादी उपस्थित होते.









