शहादा,दि.०९
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्था व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवशीय सांस्कृतिक कला महोत्सव दिनांक ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान उत्साहात पार पडला.
मंडळाच्या सरदार पटेल सभागृह, सर विश्वेश्वरैया सभागृह तसेच महात्मा गांधी सभागृह येथे या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात माध्यमिक शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटांमध्ये ११ कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात रांगोळी, मेहंदी, चित्रकला, कोलाज, वक्तृत्व, मातीकला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. या कलाकुसरीच्या आणि सांस्कृतिक मंचावर जवळपास ६५० स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील,मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, संचालक नूहभाई नुरानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षीय भाषणात श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग नोंदवून आपल्यातील सुप्त गुणांचा विकास घडवून आणावा असे आवाहन केले. तसेच पुढील वर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, सर्व विद्याशाखांचे प्राचार्य व उपप्राचार्य, संस्थांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, संयोजक डॉ. चंद्रशेखर सुतार, समिती सदस्य डॉ. भरत चौधरी, डॉ. प्रशांत तोरवणे, निलेश निझरे, माधुरी पवार, अश्विनी पाटील, कंचन मोरे व कल्पना पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:
माध्यमिक गट:
- रांगोळी: प्रथम – प्रतिज्ञा रविंद्र गिरासे, द्वितीय – जान्हवी नरोत्तम पाटील, तृतीय – दामिनी उमेश गिरासे.
- चित्रकला: प्रथम – कल्याणी किसन पावरा, द्वितीय – हितेश ईश्वर शिरसाठ, तृतीय – नंदिनी विरसिंग पाडवी.
- मेहंदी: प्रथम – सकीना दिनेश ठाकरे, द्वितीय – जोगेश्वरी नारायण पाटील, तृतीय – जान्हवी नरोत्तम पाटील.
- मातीकला: प्रथम – वेद प्रमोद सोनार, द्वितीय – अंकिता माधव दावळे, तृतीय – दिशांक श्रीराम चौधरी.
- कोलाज: प्रथम – दिवेश रविंद्र कोळी, द्वितीय – रितिका लक्ष्मण रगतवाण, तृतीय – उर्वशी सुरेश नवसारे.
- वक्तृत्व: प्रथम – मयूर दिलीप मोरे, द्वितीय – मोक्षदा गणेश पाटील, तृतीय – तनुष्का सदाशिव बागुल. (उत्तेजनार्थ: अंजली शांतीलाल कोळी, विशाखा कैलास मराठे).
- समूह लोकगीत: प्रथम – माध्यमिक विद्यालय धुरखेडा, द्वितीय – कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विद्याविहार, तृतीय – श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा.
- मूकनाट्य: प्रथम – माध्यमिक विद्यालय विद्याविहार, द्वितीय – वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर, तृतीय – श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा.
- प्रहसन: प्रथम – वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर, द्वितीय – श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा, तृतीय – श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा.
- समूह लोकनृत्य: प्रथम – माध्यमिक विद्यालय विद्याविहार, द्वितीय – माध्यमिक विद्यालय बिलाडी, तृतीय – कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विद्याविहार.
- सुगम गायन: प्रथम – समृद्धी प्रमोद मोरे, द्वितीय – तनुष्का सदाशिव बागुल, तृतीय – रुद्राणी अनिल ठाकरे.
महाविद्यालयीन गट: - रांगोळी: प्रथम – श्वेताकुमारी चंद्रदेव शर्मा, द्वितीय – चैताली विजयसिंग गिरासे, तृतीय – रितेश्री जितेंद्र वाडीले.
- चित्रकला: प्रथम – रोहिणी सचिन महिरे, द्वितीय – प्रेरणा चिंतामण कुंभार, तृतीय – धनश्री प्रफुल गिरासे.
- मेहंदी: प्रथम – प्रियंका ताराचंद पाटील, द्वितीय – दिशा सुनील चव्हाण, तृतीय – वैष्णवी भिका निकवाडे.
- माती कला: प्रथम – धनश्री भगवान गिरासे, द्वितीय – प्रेरणा चिंतामण कुंभार, तृतीय – निलेश राजेंद्र जाधव.
- कोलाज: प्रथम – चंदेल पूर्वा हरिश्चंद्र, द्वितीय – राजकन्या भगवान महिरे, तृतीय – जयश्री दीपक पाटील.
- वक्तृत्व: प्रथम – प्रियल कांतीलाल पटेल, द्वितीय – फातेमा मो. रफिक ईसानी, तृतीय – यश विनय कोळी. (उत्तेजनार्थ: शेख आलिया मो. युसुफ).
- समूह लोकगीत: प्रथम – कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा, द्वितीय – औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा, तृतीय – तंत्रनिकेतन महाविद्यालय शहादा.
- मूकनाट्य: प्रथम – औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा, द्वितीय – अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा, तृतीय – कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा.
- प्रहसन: प्रथम – औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा, द्वितीय – वरिष्ठ महाविद्यालय शहादा, तृतीय – औषध निर्माण शास्त्र पदविका महाविद्यालय शहादा.
- समूह लोकनृत्य: प्रथम – औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा, द्वितीय – औषध निर्माण शास्त्र पदविका महाविद्यालय शहादा, तृतीय – कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा.
- सुगम गायन: प्रथम – प्रज्ञा गौतम जमदाडे, द्वितीय – भाविका रविंद्र चौधरी, तृतीय – अक्षरा पंडित मोरे.
कर्मचारी गायन स्पर्धा: - प्रथम – श्री किरण ठाकरे, द्वितीय – श्री शशिकांत महिरे, तृतीय – सौ. नीलिमा पाटील.
सर्वसाधारण विजेतेपद: - प्रथम: श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा
- द्वितीय: औषध निर्माण शास्त्र पदविका महाविद्यालय शहादा
- तृतीय: वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर











