• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार झनक यांच्या प्रयत्नांना यश; कळंबेश्वर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे पिके संकटात; अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येची आमदारांकडून तातडीने दखल

मालेगाव : प्रतिनिधी | दि. ९ सप्टेंबर

RelatedPosts

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

तालुक्यातील कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने संकटात सापडली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जात असले तरी अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीपंप सुरू करणे शक्य होत नसल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.

शेतकऱ्यांची ही समस्या आमदार अमित झनक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच आवश्यक विद्युत वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची शिफारस आमदार झनक यांनी महावितरणकडे केली आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून कळंबेश्वर परिसराची तांत्रिक पाहणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होऊन वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या समस्येच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश पायरू अवचार यांच्या पुढाकाराने शिवदास तांबेकर, नामदेव गव्हांदे, सुरेश अवचार, शोभा बोराटे, देविदास वानखेडे, राजेश बोराटे, प्रकाश चतरकर, यशवंत पठाडे, शंकर बोरचाटे आणि दाजिबा अवचार यांनी पाठपुरावा केला. आमदार झनक यांच्या तातडीच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Tags: Aalok Bande
Previous Post

सारोळा शाळेत सावळेश्वर शेतकरी गटाच्या वतीने वृक्षारोपण

Next Post

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
1
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
0
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
2
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Blog

धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी सावंत यांचे शासनाकडे निवेदन

September 10, 2026
3
Next Post

मालेगाव शहरात वारंवार वीज खंडित; नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In